शेतात वांगी पिकवणार्या बंडू घोरमडेला ती खरेदी करणार्या मध्यस्थाने दिलेली 500 रु.ची जुनी नोट घेण्यावाचून पर्याय तर नव्हताच, पण त्याचबरोबर त्याला 40 किलो वांग्याच्या प्रत्येक टोपलीमागे 200 रुपये कमीही करावे लागले. पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेले घोरमडे म्हटले, ‘मी जर असे केले नसते, तर माझी सगळी ताजी वांगी वाया गेली असती.’ नागपूरपासून 50 किमी अंतरावर चिंचोली गावात राहणारे घोरमडे वांग्याशिवाय गाजर, पालक आणि भेंडी या भाज्यादेखील पिकवतात. ‘जे लोक धान्ये अथवा कापूस पिकवतात ते पैशांसाठी थांबू शकतात, मला ते शक्यच नाही’, ते म्हणतात. गेल्या कित्येक वर्षांपासून ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यात रोज घोरमडे 400 किलो भाज्या घेऊन नागपूरच्या राज्यशासन संचलित शेती उत्पादन बाजार समितीच्या बाजारात येत असतात आणि तिथल्या परवानाधारक मध्यस्थांना आपला माल विकत असतात.
Subscribe Now !
Get instant access to the complete Watsaru archives
New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.