97632 06212 pwatsaru@yahoo.com

आत्मघातकी पाऊल


रोजंदारीवर किंवा इतर कुठल्याही अल्पमजुरीवर इमानेइतबारे काम करणार्यांसाठी ‘नोटबंदी’चा निर्णय हा अत्यंत वेदनादायी जखम बनला आहे. नोटबंदीच्या या 'कठोर' निर्णयाला एक सणसणीत चपराक हाणत काळा पैसा निर्मिणारे, बाळगणारे मात्र सहीसलामत सटकताहेत. असे म्हणतात की पैसा किंवा धनसंपत्ती ही संकल्पना आत्मविश्वास जागवते. पण 8 नोव्हें. 2016 च्या मध्यरात्री नोटबंदी निर्णयाच्या एका फटक्यात करोडो भारतीयांचा आत्मविश्वास गळून गेला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत चलनात असलेले 86% चलन हे 500 रु. व 1000 रु. नोटांच्या स्वरूपात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या निर्णयामुळे या नोटांचे मूल्य एका रात्रीत रद्दी कागदाच्या चिटोर्याएवढे बनून गेले. आपले सरकार हे आपल्या आणि आपल्या पैशांचे रक्षण करते या जनतेच्या भारत सरकारवरील विश्वासाला एका उतावीळ, उथळ निर्णयाने पार तडा गेला आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe