97632 06212 pwatsaru@yahoo.com

नरेंद्र मोदी, बॉब डायलन आणि विमुद्रीकरण


बिचारा बॉब डायलन! एकटा राहणे पसंत करणारा हा गायक नोबेल पुरस्कार मिळाल्याने आधीच आपल्यावर आलेल्या ताणाशी भिडण्याचा प्रयत्न करत असताना मोदींनी त्याला आपल्या सेवेत रुजू करून घेतलेले आहे. होय, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच ही कृती आहे. 19 नोव्हेंबर रोजी मुंबईतील ‘कोल्डप्ले कंसर्ट’ (थंड खेळाचा सांगीतिक कार्यक्रम!) प्रचंड चमकधमक असलेल्या आणि उच्च आणि उच्चमध्यमवर्गीय तरुणतरुणींसाठी असलेल्या या खास कार्यक्रमात मोदींचा प्रेरणापर व्हिडिओ संदेश दाखवण्यात आला. मोदींनी डायलनला आपल्या विमुद्रीकरणवाद्यांच्या गँगमध्ये सामील करून घेतले ते याच वेळी. 500/1000 च्या नोटा अचानक रद्द ठरवण्याच्या आपल्या अत्यंत विनाशकारी खेळीला विरोध करणार्यांवर शाब्दिक हल्ला चढवताना मोदींनी डायलनच्या अत्यंत प्रसिद्ध असलेल्या गाण्यातल्या ओळींचा वापर केला, अर्थातच निवडक ओळींचाच. ‘देशभरातील आयांनो आणि बापांनो पुढे या आणि टीका करू नका, जे तुम्हाला कळत नाहीय, तुमची मुलं आणि मुली तुमच्या नियंत्रणाच्या बाहेरच राहणार... कारण ती काळाप्रमाणे बदलत आहेत...’

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe