97632 06212 pwatsaru@yahoo.com

स्टॅलिनच्या नावाने...


सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बोलणार्यांची संख्या देशात कमी आहे. प्रसारमाध्यमे तर मोदींची आरती ओवळण्यात धन्यता मानत आहेत. विरोधी पक्षाशिवाय काही मोजकेच लोक मोदींच्या विरोधात बोलण्याचे धाडस करीत आहेत. यात हरीश खरे यांचे नाव घेतले पाहिजे. हरीश खरे यांचा मोदींच्या नोटाबंदीबाबत एक लेख ‘वाटसरू’च्या अंकात (1 ते 15 डिसेंबर 2016) प्रसिद्ध झाला आहे. खरे यांनी मोदींच्या नोटाबंदीबाबत सडेतोड विश्लेषण केले आहे. व्यक्तिपूजा किती घातक ठरू शकते आणि लोकशाहीत कोणा एका व्यक्तीच्या हाती अशी सत्ता एकवटणे लोकशाहीसाठी अतिशय धोकादायक आहे, असे हरीश खरे यांनी मांडले आहे. लोकशाहीवर विश्वास असणार्या कोणालाही हा धोका माहीत आहे आणि खरे यांच्याशी ते सहमतही असतील. मात्र या लेखात खरे यांनी मोदींची तुलना स्टॅलिनशी केली आहे. मोदी आणि स्टॅलिनची तुलना कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही बाबतीत करणे गैरच नाही तर अज्ञानपणाचे लक्षण आहे, असे मला वाटते.