97632 06212 pwatsaru@yahoo.com

लोकशाहीतले लष्करी किस्से


सन 2004. एका सैन्याने त्यांनी पकडलेल्या कैद्यांवर लैंगिक व इतर सर्व प्रकारचे अनन्वित व भीषण अत्याचार केले. सर्व जगाला ते माहीत झाले. ज्यांनी अत्याचार केले ते सैनिक एखाद्या ‘बनाना रिपब्लिक’चे नव्हते किंवा एखाद्या लष्करी हुकूमशाहीवाल्या देशाचेही नव्हते - ते अघोरी सैनिक होते एका लोकशाही देशाचे - ते सैनिक होते अमेरिकेचे. ज्यांच्यावर अत्याचार करण्यात आले ते कैदी होते अबू गरीब तुरुंगात डांबलेले इराकी कैदी.