97632 06212 pwatsaru@yahoo.com

बाजारातली मरणकळा...


हंडरगुळी हे उदगीर तालुक्यातील (जि. लातूर) जनावरांच्या बाजाराचे प्रसिद्ध ठिकाण. शिरूर ताजबंद या माझ्या गावापासून आठ किलोमीटरवर. इथे निजामकाळापासून हा बाजार भरतो. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड येथून व्यापारी व शेतकरीही बैलांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यासाठी या बाजारला येतात. माझ्या बालपणापासून मीही सतत या बाजारला जातो. काल नोटाबंदीचा बाजारवर काय परिणाम झाला, हे जाणून घेण्यासाठी सकाळीच मुद्दाम हंडरगुळीला गेलो. डिसेंबरचा बाजार म्हणजे प्रचंड गर्दी. जनावरांना बांधायला जागा मिळत नाही... हे मी नेहमी अनुभवलेलं दृश्य. कालचं बाजारातलं चित्र हादरवून टाकणारं होतं. गतवर्षी कोरड्या दुष्काळातही बाजार वाहत होता... अन् काल बाजारात नेहमीच्या तुलनेत पंचवीस टक्केच बैल... बहुतेक दावणी रिकाम्या... उदास चेहर्यानं बसलेले शेतकरी... सगळीकडं मरणकळा...शोधूनही हास्य दिसत नव्हतं.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe