97632 06212 pwatsaru@yahoo.com

म्होरकी : आदिवासी स्त्रीमनाचा प्रबुद्ध हुंकार


ऐंशीच्या दशकात दलित साहित्य चळवळीतील प्रेरणा घेऊन विमुक्त, भटके व आदिवासींनी आपले स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करत स्वतंत्र साहित्य प्रवाहांची निर्मिती केली त्यामध्ये आदिवासी साहित्य हा अत्यंत सशक्तपणे गतिमान असणारा प्रवाह आहे. आदिवासी साहित्यामध्ये जल, जमीन व जंगल या घटकांशी निगडित अनुभव मांडलेले आहेत. आदिवासी साहित्यात स्त्रियांचे लेखन अल्प असले, तरी त्यामध्ये उषाकिरण आत्राम हे नाव महत्त्वाचे आहे. आदिवासी स्त्रीचे वास्तववादी जीवनानुभव त्यांनी मांडलेले आहेत, याची साक्ष म्हणजे त्यांचा ‘म्होरकी’ हा कवितासंग्रह होय.