97632 06212 pwatsaru@yahoo.com

'दंगल' कुणासाठी : स्त्रीमुक्तीसाठी की राष्ट्रासाठी?


‘दंगल’ चित्रपटाचे ट्रेलर्स पाहताना त्यात स्त्रीवाद, स्त्रीभ्रूणहत्या, खाप पंचायत, ऑनर किलिंग याविषयी आणि त्या अनुषंगाने महिला कुस्तीपटूविषयी मांडणी असेल, असा सर्वसामान्य अंदाज वर्तविला जात होता. कारण चित्रपटात हरियाणातील महिला कुस्तीपटू गीता व बबिता फोगाट, त्यांचे पिता व प्रशिक्षक महावीरसिंग फोगाट यांच्या वाटचालीचे दर्शन घडणार अशी चर्चा मीडियात होती. हा चित्रपट कसा आहे, त्याचे आजच्या काळाशी संदर्भ काय आहेत, याचा थोडक्यात परामर्श हा लेख घेणार आहे.