97632 06212 pwatsaru@yahoo.com

सकल आणि मक्तेदार...


मागच्या काही वर्षांत आपल्या राज्यात आणि एकूणच देशात विविध जातीजमातींचे आरक्षण लढे तीव्र झालेले पाहावयास मिळतात. विविध राज्यात ज्यांना प्रस्थापित मानले गेले होते त्यांनीही अत्यंत व्यापक लढे उभारले आहेत. तसेच आपल्या न्याय्य हक्कासाठी अनेक वंचित घटकही आपापल्या परीने लढत आहेत. त्या त्या घटकांतील शिकलेल्या तरुणांनी यात पुढाकार घेतलेला आहे.