97632 06212 pwatsaru@yahoo.com

अदानी समूहानं १,००० कोटी रुपयांचा कर बुडवला ?


गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहानं हिरे व सोन्याचे दागिने यांचा व्यापार करताना कथितरित्या कर बुडवल्याचा आरोप आहे. या संदर्भात महसूल गुप्तचर संचालनालय (डिरोक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इन्टेलिजन्स- डीआरआय) गेली दहाहून अधिक वर्षं तपास करतं आहे. अर्थ मंत्रालयाच्या महसूल खात्याचा तपास विभाग म्हणून हे संचालनालय काम पाहातं. सुमारे एक हजार कोटी रुपये इतका कर बुडवल्याचा आरोप करत या संचालनालयानं अदानी समूहाला अनेक कारणे-दाखवा नोटीसा पाठवलेल्या आहेत. हेच अदानी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय मानले जातात.