97632 06212 pwatsaru@yahoo.com

'शुद्धीचा फेटीशीझम' : एक सार्थ संकल्पना?


'फुलेवादी परंपरा आणि समाजक्रांतीचा पेच' हा उमेश बगाडे यांचा दीर्घ लेख वाटसरूमध्ये जानेवारी 2017 मध्ये दोन भागात आला आहे. हा लेख म्हणजे कॉ. प्रभाकर वैद्य यांच्या म. फुले यांच्यावरील पुस्तकाच्या पुनर्मुद्रित आवृत्तीला कॉ. उमेश बगाडे यांनी लिहिलेली प्रस्तावना आहे. या लेखात त्यांनी एका प्रश्नाबद्दल एक नवी मांडणी केली आहे. माझी ही टिपणी या त्यांच्या नव्या मांडणीबद्दल आहे.