97632 06212 pwatsaru@yahoo.com

लिंगभाव असमानतेची बहुविध रूपे


राणी व्हिक्टोरियाने सुमारे एका शतकापूर्वी म्हणजे 1870 मध्ये सर थियोडोअर मार्टिन यांना तक्रारीच्या स्वरात स्त्रियांच्या अधिकारांविषयी लिहिले होते. या पत्रात राणीने स्त्रियांच्या अधिकारांच्या मागण्यांना वेडसरपणा आणि मूर्खपणाचे कृत्य म्हटले होते. खरे तर शक्तिमान सम्राज्ञीला अशा प्रकारच्या अधिकारांमधून स्त्रियांना मिळत असणार्या संरक्षणाच्या पोचपावतीची गरज नव्हती. 1899 साली वयाच्या ऐंशीव्या वर्षीसुद्धा तिने ‘आम्हाला निरर्थक पराभवी शक्यतांमध्ये काहीच स्वारस्य नाही; त्या अस्तित्वातच नाहीत’, असे ऑर्थर जेम्स बालफोर यांना लिहिले होते. असे असले तरी मात्र सगळ्याच लोकांचे आयुष्य असे जात नसते, बरेचदा ते वारंवार येणार्या संकटांमुळे खुंटून जाते, पराभूत होते आणि प्रत्येक समुदायात, राष्ट्रीयत्वात आणि वर्गसंस्थेत बरेचदा स्त्रियांवरच कष्टांचा प्रमाणाबाहेर ताण पडतो.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe