97632 06212 pwatsaru@yahoo.com

दशकपूर्ती भारतीय मुस्लीम महिला आंदोलनाची


भारतीय मुस्लीम महिला आंदोलन संस्थेची लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समता, अहिंसा, मानवी हक्क, न्याय ह्या भारतीय संविधानातील मूलभूत मूल्यांवर श्रद्धा आहे. आंदोलनचे मुख्य काम व उद्दिष्ट आहे मुस्लीम महिलांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी समर्थ बनवणे आणि संघटित करणे. सामाजिक, आर्थिक, राजकीय, सनदी, कायदेशीर, मानवी हक्क मिळवून देण्यासाठी सक्षम, सजग, सशक्त म्हणून तयार करणे. कुराणच्या सकारात्मक, उदारमतवादी आशयाचा, विचाराचा मुस्लीम महिलांमध्ये प्रसार करणे.