97632 06212 pwatsaru@yahoo.com

नाही नव्याची नवलाई: आधुनिक राजकारणातील ‘पोस्ट-ट्रूथ’


मानवी ज्ञानव्यवस्थांच्या उदयापासून ‘सत्य’ ही संकल्पना विश्लेषणाचा विषय राहिली आहे. सत्य म्हणजे काय हे वेळोवेळी समाजात प्रभुत्वशाली असलेल्या श्रद्धाव्यवस्थांनी निर्धारित केलेलं आहे. उदाहरणार्थ, देवाचं अस्तित्त्व हे जगभरातील अनेक सभ्यतासंस्कृतींसाठी महा-सत्य राहिलं आहे. एखाद्या श्रद्धेची विश्वासार्हता त्यासंबंधीच्या धर्मग्रंथीय उल्लेखाधारे ठरत होती. येशू हा देवाचा एकमेव पुत्र आहे या श्रद्धेवर ख्रिश्चन धर्म उभा आहे. परंतु कोणत्याही सत्याच्या जन्मासोबतच त्याकडे अनेकवचनामध्ये पाहिलं गेलं. ख्रिश्चन व मुस्लीम या दोन धर्मांच्या संघर्षामध्ये देवाच्या ‘सत्य’ स्थानाविषयी वाद प्राचीन काळात सुरू झाला. दुसऱ्या बाजूला धार्मिक पोथिनिष्ठतेपासून दूर असलेल्या ग्रीकांनी सत्याचं स्थान ठरवताना अधिक औत्स्युक्य दाखवलं. मानवी ज्ञानाच्या मर्यादेविषयी पूर्ण जागरूक असलेल्या प्राचीन ग्रीकमधील शंकाखोर चिकित्सक विचारकांनी सत्याला पूर्वनिर्धारित स्थान देण्याबद्दल अनास्था दाखवली.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe