97632 06212 pwatsaru@yahoo.com

डॉ. कृष्णा किरवले


किरवले सर काल तुम्ही गेलात... रात्री फार उशिरा समजली मला ती वाईट बातमी... अशा पद्धतीनं तुमचं जाणं...एखादे दुस्वप्न वाटतयं... विश्वासच बसत नाहीये....खूप अस्वस्थ व्हायला झालंय सर... बरेच दिवस झाले सर...तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती...खूप साधी होती...पण का कुणास ठावूक मला सांगताच आली नाही...आणि ती अशा पद्धतीने सांगावी लागेल असेही कधी वाटले नाही... सर... सर मला थँक्यू म्हणायचे होते...थँक्यू म्हणायचे होते सर तुम्हाला...