97632 06212 pwatsaru@yahoo.com

आजचे नाटक


खरे ‘आजचे नाटक’ हे अमुकच प्रश्नांचे वा अमुकच माहोलाचे असावे लागते, असे मुळीच नाही. ते सर्वच माणसांच्या जगण्याबद्दल आस्था बाळगणारे असावे लागते. माणसाला एकूणच जगण्याच्या प्रक्रियेबद्दल संवेदनशील करणारे - त्याबाबतचे भान देणारे असावे लागते. अशा ‘आजच्या नाटकांचा’ मराठीत दुष्काळ आहे. तशा नाटकांसाठी वातावरण मोकळे राहो आणि लेखक पूर्ण कुवतीने त्यांच्या स्वतंत्र चिंतनशीलतेला महत्त्व देवोत, हीच सदिच्छा