97632 06212 pwatsaru@yahoo.com

जुनी गाणी आणि नव्या रॉयल्टीज्


आपल्या देशात कॉपीराईट संकल्पनेचा अंमल शंभराहून जास्त वर्षांपूर्वी सुरू झाला. या क्षेत्रातील पहिला कायदा म्हणजे इंडियन कॉपीराईट अॅतक्ट, 1914. स्वातंत्र्योत्तर काळात कॉपीराईट अॅहक्ट 1957 पारित करून आपल्या सरकारने एक क्रांतिकारी पाऊल उचलले. आत्तापर्यंत या कायद्यात सहा वेळा फेरबदल करण्यात आले आहेत. अलीकडचे बदल 2012 साली करण्यात आले, जे 2013 पासून लागू झाले आहेत. 2012 सालचे हे फेरबदल करण्याचे श्रेय जावेद अख्तर यांनी राज्यसभेत दिलेल्या एका भाषणाला देण्याची आजकाल एक फॅशन झाली आहे. पण तसे म्हणणे बरोबर नाही.