97632 06212 pwatsaru@yahoo.com

मीच मला व्याले


'माझी आई आणि भाऊ जे काम करतात ते मी कधीच करणार नाही. हे काय काम आहे? सार्याद दुनियेने हागून-मुतून केलेली घाण मी या जन्मात तरी साफ करणार नाही.' हा निश्चदय वैशाली वाल्मीकी या मुलीने बालपणी अनेकदा केला होता. एरवी असा निश्च य करण्याची वेळ कुणावर का येईल? पण वैशालीची आई सफाई कामगार होती. दोघे भाऊदेखील हेच काम करत होते. वैशालीला मात्र शिकण्याची आवड होती. पण लग्न झालं, दोन अपत्यं झाली नि तिच्या लक्षात आलं, की आपल्या लेकरांचं नशीब घडवायचं असेल तर आपल्यालाही बापजाद्यांचं काम करावंच लागेल. आपल्या आईप्रमाणेच मग तिनेही हातात बादली-खराटा घेतला आणि 'चकाचक पुणे' हे खोटं बिरूद मिरवणार्याआ रौरवाच्या दुनियेत वयाच्या गद्धेपंचविशीत तिचा प्रवेश झाला.