97632 06212 pwatsaru@yahoo.com

अंगठा


ही गोष्ट आहे चाळीस एकरभर वावराच्या किंमतीच्या अंगठ्याची! माणसाच्या अंगठ्याची किंमत एवढी असू शकते काय? बरं असेलही एवढी किंमत! त्याच्यावर गोष्ट रचता येईल काय? पण मी रचली! कारण ती गोष्ट माझ्याभोवती घडलीय! म्हणजे वास्तवय; समस्या ही आहे, की एकतर अलीकडे माणूस वास्तवाला फार घाबरायला लागला. पण हे वास्तव ज्यांच्या आयुष्याला बिलगलंय त्यांचं काय? म्हणून त्यांच्या बाजूनं उभं राहून मला ही गोष्ट सांगावीच लागेल.