97632 06212 pwatsaru@yahoo.com

माणूस मेलं तरी कुणी विचारायला येत नाही...


भटक्या-विमुक्तातील बर्‍याच जमाती ह्या वसाहतपूर्व काळात अस्थायी स्वरूपाचे कोणते न् कोणते व्यवसाय करत होत्या. वसाहतिक काळात त्यांचा राजाश्रय आणि व्यवसाय कौशल्य गेल्याने आधीच अस्थायी असलेले हे लोक पुन्हा भटके बनले आणि त्यांनी आपल्या बंधमुक्तीच्या विद्रोही कारवाया सुरूच ठेवल्या. छप्परबंद हे त्यापैकीच एक. त्यांनी खोटी नाणी पाडून वसाहतवादी चलन व्यवस्था विस्कळीत केली. या छप्परबंद जमातीच्या महिलांच्या विद्यमान स्थितीविषयी जैतूनबी यांच्याशी केलेली चर्चा.