77769 02267 pwatsaru2@gmail.com

अस्मितांचे राजकारण २


अस्मिता ही एक सांस्कृतिक गोष्ट आहे. पण त्याचवेळी तो सत्ताकारणाचा एक नामरूपादिबंध आहे ही गोष्ट लक्षात आली तर आपण अस्मितांच्या उत्पादन, पुनरुत्पादनाला, जडणीघडणीला, अस्मितांच्या विश्वा ला फक्त पाया, फक्त इमारत किंवा फक्त विकासाचा एक नंतरचा टप्पा असे न मानता आपण त्यांना एकाचवेळी व्यवस्थात्मक, संरचनात्मक, भौतिक रूपात पाहू शकतो.