97632 06212 pwatsaru@yahoo.com

नकार, वेदना व विद्रोहाकडून ‘अस्वस्थते’कडे


दलित साहित्यात नकार, वेदना आणि विद्रोहाला केंद्रस्थानी ठेवून लेखन झालेले दिसते. आजच्या सैद्धांतिक लेखनात ‘अस्वस्थता’ ही केंद्रस्थानी दिसून येते. क्रांतीचे स्वप्न पाहत लेखन केले जात होते. परंतु त्याच परंपरेचा वारसा सांगणारे लेखक अस्वस्थ होऊन प्राप्त परिस्थितीचे चिकित्सक आकलन करीत आहेत.