77769 02267 pwatsaru2@gmail.com

धरणग्रस्तांच्या मुक्तीचा अजेंडा


गेली अनेक वर्षे धरणग्रस्तपणाचे शल्य उरात घेऊन जगत असताना कॉम्रेड संपत देसाईंचे ‘'एका लोकलढ्याची यशोगाथा'’ हे पुस्तक हातात पडले आणि अधाशासारखे ते पुस्तक वाचून संपवले. खूप काही हातातून निसटून गेल्यासारखे वाटले. खूप काही हाती लागले. निसटून गेलेल्याचे भांडवल न करता जे काही नव्याने मिळालंय त्याचा हा परामर्श.