97632 06212 pwatsaru@yahoo.com

वस्ती : फुरक्या...


साधारण १८१७मध्ये अमेरिकन मिशनरी नगरमध्ये आले. त्यांनी शाळा काढल्या. दवाखाने सुरू केले... दलित गरीब तसेच उच्चवर्णीय गरीब मुलं मुली शिकू लागली... इथल्या दलित व धर्मांतरित कामगारांना काम मिळाले... गोर्या मिशनरी साहेबांच्या बंगल्यावर काम करणार्या् अनेक पिढ्या येथे तयार झाल्या. त्यांची संस्कृती तयार झाली... ही संस्कृती कष्टकर्‍यांचीच होती, पण जगण्याशी ख्रिस्ती मूल्ये घेऊन ती बहरली... पुढे मिशनरी गेले आणि या कुटुंबांची परिस्थिती बदलली... वस्त्या कंगाल होत गेल्या. शहराच्या कोठी भागातील वस्तीतल्या ख्रिस्ती समाजजीवनाच्या प्रातिनिधिक कहाण्या.