97632 06212 pwatsaru@yahoo.com

मराठवाडा ‘मुक्तीसंग्राम‘ आणि मागासलेपणाचे स्थायीकरण


भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले; परंतु मराठवाडा हा निझामाच्या राजवटीपासून १७ सप्टेंबर १९४८ रोजी स्वतंत्र झाला. मराठवाड्याच्या निझाम राजवटीविरोधातील चळवळ ही ‘हैदराबाद मुक्तीसंग्राम’ चळवळ म्हणून ओळखली जाते. वास्तवात स्वातंत्र्य आणि मुक्ती ह्या दोन भिन्न संकल्पना आहेत.