97632 06212 pwatsaru@yahoo.com

नदीष्ट : लिव्हिंग ऑरगॅनिझम


एखाद्या नदीच्या काठावर आवडत्या मित्राच्या खांद्यावर डोकं ठेवून तासन्तास बसून राहावं आणि त्यानं त्याच्या आयुष्यातल्या घटनांची पोतडी आपल्यासमोर रिती करावी. त्यानं बोलत राहावं, आपण ऐकत बसावं. वाटलं तर त्याचा चेहरा आपल्या ओंजळीत घ्यावा. कधी त्याच्या पाठीवरून हात फिरवावा. कधी त्याच्या हातावर टाळी द्यावी. कधी दोघांनीही घट्ट घट्ट मिठी मारून निघून गेलेल्या क्षणांवर टिपं गाळावीत, तशी ही कादंबरी.