97632 06212 pwatsaru@yahoo.com

विकासनीतीची कठोर चिकित्सा


अच्युत गोडबोले यांच्या अनर्थचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी त्यात कल्याणकारी भांडवलशाहीच्या भूमिकेतून नव-उदारमतवादी धोरणावर सडेतोड, तपशिलात टीका तर केली आहेच पण त्याचबरोबर नफ्यासाठी उत्पादन या अर्थव्यवहाराच्या भांडवली ढाच्यावर सरकारने कोणतेही नियंत्रण न ठेवल्याने टोकाचा पर्यावरण र्हाठस होऊन मानवी समाज कसा विनाशाच्या उंबरठ्यावर उभा आहे हेही तपशीलासह मांडले आहे.